फलटण चौफेर दि १९ मे २०२५
इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील 'जय भवानी माता' पॅनेलने निर्णायक आघाडी घेतली आहे. या पॅनेलचे सर्व २१ उमेदवार पाच ते सहा हजार मतांच्या फरकाने आघाडीवर आहेत . मतमोजणीची प्रक्रिया बारामतीतील जलसंपदा विभागाच्या प्रशासकीय भवनात सुरू असून, रात्री १० वाजेपर्यंत अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे
या निवडणुकीत अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने लक्षणीय आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत पृथ्वीराज जाचक यांना ५,४२७ मते मिळाली असून, त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना ३,००० च्या आसपास मते मिळाली आहेत या निवडणुकीत ७५% मतदान झाले असून, सभासदांनी 'पॅनेल टू पॅनेल' मतदान करत 'जय भवानी माता' पॅनेलवर विश्वास दाखवला आहे .या निवडणुकीच्या निकालामुळे स्थानिक राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.